प्रेमसंबंध तुटताच तरुणीचे “ते” फोटो केले व्हायरल
As soon as the relationship broke up, the girl’s “te” photos went viral नागपूर : प्रेमसंबंध तुटल्यानंतर संतप्त प्रियकराने तरुणीचे फोटो व्हायरल करीत बदनामी केली तसेच धमकीचे मॅसेज पाठवत तिचा विनयभंग केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विजय पृथ्वीराज ठाकरे (25, कळमना) असे आरोपीचे नाव आहे.
फेसबुकवरून झाली ओळख
एका 22 वर्षीय तरुणीची दोन वर्षांअगोदर त्याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली व त्यांचे प्रेम जुळले. मात्र काही कारणावरून तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. यावरून विजय संतापला व त्याने स्वत:सोबतचे तिचे फोटो व्हायरल केले तसेच त्याने तिला धमकी देत विनयभंग केला. तरुणीने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.








