मनमाड-नांदगाव रेल्वे रेल्वे लाईनवर 130 वेगात धावली चाचणी ट्रेन
सुरक्षा चाचणी यशस्वी : महिनाभरात रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी होणार खुला
A test train ran at 130 speed on the Manmad-Nandgaon railway line भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-जळगाव तिसर्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत मनमाड-नांदगाव दरम्यानच्या तिसर्या रेल्वे लाईनची चाचणी सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या उपस्थितीत गुरुवारी घेण्यात आली. यावेळी ताशी 130 वेगाने या मार्गावरून सुरक्षा आयुक्तांनी गाडी (ट्रायल ट्रेन) चालवून पाहणी केली तसेच अधिकार्यांना काही महत्वपूर्ण सूचना केल्या.
दरम्यान, सुरक्षा चाचणीनंतर महिनाभरात हा रेल्वे मार्ग खुला होण्याचे संकेत असून त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल व या मार्गामुळे मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे शिवाय मालगाडी वाहतुकीसाठी हा मार्ग खुला केला जाण्याचे संकेत आहेत.

2016 मध्ये मिळाली तिसर्या मार्गाची मंजुरी
मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुकीच्या कोंडीनंतर सन 2016 मध्ये तिसर्या रेल्वे लाईनीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर भुसावळ-जळगाव हा टप्पा पूर्ण करण्यात आल्यानंतर आता जळगाव ते मनमाडदरम्यानच्या 160 किलोमीटर रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. त्यातील नांदगाव ते मनमाडदरम्यानच्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी या मार्गावरून मुख्य सुरक्षा आयुक्तांनी ताशी 130 वेगाने गाडी चालवून चाचणी घेतली. दरम्यान, तिसर्या रेल्वे लाईनीमुळे मालगाड्या या मार्गावरून चालवण्यात येतील त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी होणार आहे शिवाय विलंबाने धावणार्या रेल्वेगाड्या वेळेत धावण्याचे नियोजन प्रशासनाला करता येणार आहे.
चाचणी प्रसंगी यांची उपस्थिती
चाचणीप्रसंगी मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्यासह भुसावळ डीआरएम ईती पांडे, मुख्य अभियंता एस.के.झा, उपमुख्य अभियंता श्री किशोर सिंह तसेच रेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
