भुसावळात अंनिसचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा


Annis’s march to the District Magistrate’s Office in Bhusawal भुसावळ : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून नरेंद्र दाभोळकरांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपींना त्वरीत अटकेची मागणी करण्यात आली तसेच मणिपूर राज्यातील हिंसाचार थांबविण्यासाठी या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात शहरातील समविचार संघटनांनी सहभाग नोंदवला.

दहा वर्षानंतर हत्या करणारा मोकाट
डॉ.दाभोळकर यांची हत्या होऊन दहा वर्ष पूर्ण झाली. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी अद्यापही मोकाट असल्याने त्यास अटक का केली जात नाही? याबाबत संपूर्ण नागरीकांमध्ये असंतोषाची भावना आहे. या प्रकरणात जाणीवपूर्वक कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार माजून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. इतर राज्यात घडला असता तर केंद्र सरकाने तातडीने कारवाई केली असती. याबाबत संपूर्ण देशात नाराजी आहे, यामुळे मणिपूरमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू ककरीत शांतता प्रस्तापीत करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात महाराष्ट्र अंधश्रध्दा निमुर्लन समितीचे अरुण दामोदर, प्रल्हाद बोराडे, चंद्रकांत चौधरी, शामकुमार वासनीक, प्रेम परदेशी, सिध्दार्थ सोनवणे, सुनील जोहरे, संतोष मेश्राम, विशाल गायकवाड, सुमंगल अहिरे, आनंद सपकाळे, राजेश तायडे आदींसह पदाधिकारी सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !