भुसावळ विभागातील तीन तालुक्यांना लाभले अखेर पोलीस पाटील
1 रोजी निघणार आदेश : प्रशासन व पोलीस यंत्रणेतील दुवा लाभला.
Three talukas of Bhusawal division finally benefited from Police Patil भुसावळ : प्रशासन व पोलीस यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटलांचे रीक्त पद प्रक्रियेअंती भरण्यात आले. भुसावळसह बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यासाठी पोलीस पाटलांची नियुक्ती लेखी व तोंडी परीक्षेअंती करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर रोजी नियुक्तीबाबत अधिकृत आदेश काढण्यात येणार आहेत.
रीक्त पदे भरण्यात आल्याने यंत्रणेला दिलासा
भुसावळ विभागातील भुसावळ, बोदवड आणि मुक्ताइनगर या तालुक्यातील पोलीस पाटील पद रीक्त असल्याने पोलीस व प्रशासनाने दैनंदिन कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत होता शिवाय गावातील घटना-घडामोडी तसेच शासनाचे निरोप जनतेपर्यंत पोहोचण्यात अडचणी भासत होत्या मात्र प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व त्यांच्या समितीने पोलीस पाटील पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या लेखी व तोंडी मुलाखती घेत त्यांच्या नियुक्ती निश्चित केल्या आहेत.

भुसावळ तालुक्यासाठी यांची नियुक्ती
भुसावळ तालुक्यातील कन्हाळे खुर्द येथे पराग दिलीप सपकाळे, खडके येथे ज्ञानेश्वर विठ्ठल आमले, चोरवडसाठी सचिन साहेबराव ठाकरे, जोगलखेडेसाठी भूषण पांडुरंग पाटील, पिंपळगाव बुद्रूकसाठी नितीन जनार्दन सोनवणे, बेलखेडेसाठी सरला विजयसिंग पाटील, बेलव्हायसाठी निलेश ज्ञानदेव अंबीकार, मिरगव्हाणसाठी अर्चना इंगळे, साकेगावला गणेश शांताराम भोई, सुनसगावला खुशाल लक्ष्मण पाटील
मुक्ताईनगर व बोदवडसाठी यांची नियुक्ती
मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे भावना एकनाथ कोळी, पिंप्री अकराऊत येथे गोपाळ अशोक सपकाळे, बेलसवाडी येथे जितेंद्र गजानन पाटील, माळेगावला सर्वेश्वर गोविंदा पाटील, राजोरे दीपक गजानन बावस्कर, शेमळदे येथे दीपक वसंत भोई, सारोळा येथे ज्ञानेश्वर रामा कोळी तसेच बोदवड तालुक्यात करंजी येथे प्रशांत गजानन सूर्यवंशी, गोळेगाव खुर्द येथे सोपान रामकृष्ण अवचार, जामठी येथे दिपक साहेबराव पाटील, निमखेडीला प्रीती गुणवंतराव गलवाडे, वडजी गुणवंत प्रमोद पाटील, वाकी येथे प्रियंका दिनेश पाटील, साळशिंगीला गजानन भाऊलाल धांडे, हरणखेडला उल्हास विनायक खडके यांची गुणानुक्रमे निवड निश्चित करण्यात आली.
