भुसावळातील पोलीस बांधवांना तणावमुक्तीचे धडे
भुसावळ : योग्य वेळी आहार कमी असला तरी चालेल पण शांत झोप व मानसिक समाधान असणे गरजेचे आहे. पोलिसांचे आयुष्य देशसेवेसाठी असून 24 तास ते देशरक्षणाचे काम करतात त्यामुळे हे कर्तव्य जवाबदारी पार पाडण्यासाठी पुरेशी झोप घेवून तणावमुक्त रहावे, असे सल्ला डॉ.उर्मी ठक्कर यांनी येथे दिला. रक्षा बंधनांच्या अनुषंगाने शहरातील पोलिसांसाठी तणावमुक्तीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भुसावळसह फैजपूर विभागातील सुमारे 150 बांधव सहभागी झाले. महिला क्रीडा मंडळाच्या ध्यक्ष आरती चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
काम करताना स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे
पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी मनोगतात सांगितले की, काम करताना स्वतःकडे लक्ष देणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे व कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे हे सर्व करताना कुठेही ताण निर्माण झाला तर त्याचा परीरणाम शरीरावर होत असल्यानेच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.उर्मी ठक्कर यांची ओळख जयश्री ओक यांनी केली. करून दिली. कार्यक्रमात डॉ.उर्मी ठक्कर शंकांचे निरसन केले. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सतीश कुलकर्णी, भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलीस स्टेशन निरीक्षक बबन आव्हाड, शहर वाहतूक शोच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ, इतर पोलीस होमगार्ड यांची उपस्थिती होती. सू

त्रसंचलन स्वाती नाईक तर आभार प्राची राणी यांनी मानले. महिला क्रीडा मंडळाच्या आरती चौधरी, लता होसकोटे, स्वाती नाईक, जयश्री ओक, कावेरी चौधरी, राजश्री कात्यायनी, प्राची राणे, सुनीता पाचपांडे, विणा ठाकुर, भारती चव्हाण, किरण शुक्ला, दिपाली सराफ, वैशाली पाटील, संगीता पाटील, विजया निकम, विनीता नेवे, वैशाली बर्हाटे उपस्थित होत्या.
