रावेर लोकसभेसाठी केतकी पाटील भाजपात जाण्याची चर्चा ! जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला ‘हा’ मोठा दावा
There is talk of Ketaki Patil going to BJP for Raver Lok Sabha! District President Pradeep Pawar made this big claim जळगाव : रावेर लोकसभेच्या विद्यमान उमेदवार खासदार रक्षा खडसे असल्यातरी आगामी काळात भाजपाचा नेमका उमेदवार कोण असणार? याबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच आता माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रावेर लोकसभेचा दौरादेखील सुरू केल्यानंतर डॉ.केतकी या आगामी काळात भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चादेखील केली जात असताना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. पवार म्हणाले की, डॉ.केतकी या काँग्रेस सोडणार नाहीत, त्या पक्षातच राहतील, या केवळ चर्चा सुरू आहेत.
पत्रकार परीषदेत केला हा दावा
जिल्ह्यात 3 सप्टेंबरपासून काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी प्रदीप पवार यांनी शनिवारी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली असता त्यात त्यांनी पक्षफुटीबाबत होत असलेल्या चर्चा व अफवांबाबत स्पष्टीकरण केले. काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा डेटा ऑनलाईन आहे. जो कोणी पक्षाचा कधी सदस्यच नाही. कोणी तरी कार्यकर्ता दुसर्या पक्षात प्रवेश करतो आणि तो काँग्रेसचा आहे, काँग्रेसमध्ये खिंडार पडले असे विरोधकांकडून भासविले जात असून दिशाभूल केला जात आहे. काँग्रेसमध्ये कदापीही फूट पडणार नाही. डॉ.उल्हास पाटील कॉग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रस्थानी आहेत, त्यांनीही आपण व मुलगी कधीही कॉग्रेस सोडणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे तरी देखील काही जण वावड्या उठवत असल्याचे पवार म्हणाले.

