रोहिणी खडसे यांनी स्वीकारला महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार


Rohini Khadse accepted the charge of Mahila Aghadi Regional President मुक्ताईनगर : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांची निवड केल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, महिला आघाडी मावळत्या अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी त्यांना प्रदेश कार्यालयात नियुक्तीचे पत्र दिले होते. नियुक्तीनंतर बुधवार, 30 रोजी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवणार : रोहिणी खडसे
पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाने माझ्यासारख्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याव्र विश्वासाने महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून पक्ष नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. पक्ष संघटन वाढीसाठी मेहनत घेऊन शरद पवार व पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेल शिवाय महिलांच्या न्याय हक्कासाठी पक्षाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !