जळगावात इच्छादेवी चौफुली जवळील दुकानावर दगडफेक


जळगाव : बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनांतर्फे नागरीकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती मात्र शहरात बंदचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यातच शहरातील इच्छादेवी चौफुली जवळील प्लाझा मेन्स पार्लर या दुकानावर काहींनी दगडफेक करण्यात आली. सकाळी प्रशांत तुकाराम फुलपगारे हे दुकानावर असताना तेथे बंदचे आवाहन करीत घोळक्याने दगडफेक केली. यात दुकानाच्या काचा फुटल्या. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ व सहकार्‍यांनी काहींना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !