कंडारीतील तिहेरी हत्याकांड : सहा संशयितांना 11 पर्यंत पोलीस कोठडी


Kandari triple murder : Six suspects remanded to 11 Septmber भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांसह एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. संशयितांची कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवार, 6 रोजी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

जुन्या वादातून हत्या :  संशयितांना पुन्हा कोठडी
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांसह रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) या युवकांची शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरात हत्या केली होती. हत्येप्रकरणी दीपक छगन तायडे व मनोज श्रावण मोरे व किरण सपकाळे (तिन्ही रा.कंडारी, ता.भुसावळ) या तिघांना सुरूवातीला अटक केल्यानंतर त्यांना 7 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर रविवारी देविदास मधकुर पवार (भील), अमोल रवींद्र कोळी व मयूर लिलाधर कानडे (कोळी, सर्व रा.कंडारी) यांना अटक केल्यानंतर त्यांनाही 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.







सहा संशयितांची पोलीस कोठडीची मंदत संपल्यानंतर गुरुवारी त्यांना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.नितीन खरे यांनी प्रभावी युक्तीवाद करीत गुन्ह्यातील शस्त्र जमा करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे कारण नमूद केल्यानंतर न्यायालयाने 11 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !