बोदवड येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
Bhoomipujan of water supply scheme at Bodwad मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथे 49.25 लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पार पडला. मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड येथे पाण्याची समस्या लक्ष्यात घेता गावातील शिवसेना पदाधिकार्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आमच्या गावातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्याबाबत आग्रह धरला होता. आमदार पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेत बोदवड गावाचा समावेश करून योजना 49.25 लक्ष रुपयांच्या योजनेस मंजूरीस आणत शुक्रवारी कामाचे भूमिपूजन केले. गावातील विकास कामांसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
आमदार चंद्रकांत पाटील, शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, आत्मा समिती अध्यक्ष महेंद्र मोंढाळे, उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, पंकज पांडव यांनी मनोगत व्यक्त केले. विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, गोपाळ सोनवणे, उप तालुकाप्रमुख शिवाजी पाटील, शेषराव कांडेलकर, गटप्रमुख विनोद पाटील, किशोर पाटील, जावेद खान, सरपंच इच्छापूर गणेश थेटे, राजू शर्मा, अविनाश वाढे, ज्ञानेश्वर तायडे, आनंद वानखेडे, अनिल राठोड, राजेश ढोले, योगेश मुळक, शेख फारुक, बाबू भाई, आत्माराम पाटील, सुधाकर पाटील, रतन खवले, दशरथ तलवारे, रमेश कांडेलकर, गणेश सोनवणे, विष्णू पाटील, वैभव पाटील, सुरेश इंगळे, कडू दुरंधर, संजय पुरकर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवसेना सोशल मीडिया सेलचे तालुका प्रमुख दीपक वाघ यांनी केले.
