भुसावळातील श्री संत हिंदी महाविद्यालयाच्या ‘मानस’ला विद्यापीठाचा पुरस्कार
Mansala University Award of Shree Sant Hindi College, Bhusawal भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाद्वारे प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक नियतकालिक ‘अंक मानस’ प्रसिद्ध केला जातो. 2020-21 या वर्षासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाद्वारे शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिक्षक दिनानिमित्त शताब्दी महोत्सव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस, कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांच्याहस्ते महाविद्यालयाला उत्कृष्ट नियतकालिक हा पुरस्कार मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रकाशक डॉ..रमेश जोशी यांनी राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. विद्यार्थ्यांच्या सूक्त कुलागुणांना वाव देण्यासाठी मानस प्रकाशित करण्यात येतो.

त्यात विद्यार्थी चारोळी, कविता, अर्थपूर्ण लेख व वर्षभरात होणार्या कार्यक्रमांचे संपूर्ण प्रकाशन करण्यात येते. त्या अंकाचे संपादक डॉ.विवेक जोशी व प्रमुख संपादक डॉ. पूनम त्रिवेदी व संपादक मंडळाचे सदस्य डॉ.सुधीर शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल, डॉ.प्रवीण जाधव, प्रा.हितेश गुप्ता, प्रा. शिबा खान, प्रा.समता तायडे यांनी सहकार्य केले. हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवीकांत परदेशी, सचिव मधुलता शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले आणि अन्य पदाधिकारी गण यांनी या पुरस्काराबद्दल कौतुक करीत अभिनंदन केले.
