मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अखेर मागे
Chief Minister’s politeness successful : Manoj Jarange Patal’s hunger strike is finally over जालना : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण छेडल्यानंतर अखेर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी गाठत आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत मागून घेतल्यानंतर जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल झाली असून तब्बल 17 व्या दिवशी उपोषण सुटले आहे.
त्या व्हिडिओवर मुख्यमंत्री म्हणाले, शेंडा आणि बुडूक दाखवला
त्रकार परीषदेमधील व्हायरल संवादावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून देवेंद्र फडणवीस मी आणि अजित पवार यांच्यात पत्रकार परीषदेबद्दल चर्चा सुरू होती. त्याचा शेंडा आणि बुडूक काढून माध्यमांनी मधले दाखवले, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. माध्यमांवर आमचा विश्वास आहे, पण त्यांनीच विश्वासघात करु नये, असे देखील मुख्यमंत्री

हेतू प्रामाणिक असणार्यांच्या मागेच जनता
मराठा समाज अतिशय शिस्तप्रिय आहे. असे असताना झालेला लाठीचार्जमुळे गालबोल लागले. यात ज्यांचा दोष होता, त्यांना निलंबीत केले आहे. इतकेच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाहीर माफी मागितली आहे. घटनेबद्दल मलाही खंत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्याच मागे जनता उभी राहत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मी उपोषण सोडण्याची विनंती केली, आणि तुम्ही ती मान्य केली, या बद्दल मी आपले आभार मानत असल्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

