केवायसीच्या बहाण्याने रावेरच्या केळी व्यापार्‍याला 98 हजारांचा गंडा


98 thousand to Raver’s banana trader on the pretext of KYC रावेर  : आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याचा बहाणा करून एका केळी ग्रुप चालकाच्या बँक खात्यातील सुमारे 98 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. रावेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

केवायसीच्या नावाखाली गंडा
रावेर तालुक्यातील नेहेते येथील नितीन प्रकाश पाटील हे आपल्या गजानन केला ग्रुपमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना अ‍ॅक्सीस बँकेचा लोगो असलेली लिंक पाठवून लागलीच दुसर्‍या मोबाईल क्रमांकाने अज्ञात व्यक्तीने नितीन पाटील यांना फोन करीत सर तुमचा पॅन कार्ड व आधार कार्ड केवायसी करायचा असल्याचे सांगून फोन कट केला.







हा प्रकार पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी अ‍ॅक्सीस बँकेत फोन करून बँकेतील माझे खाते लॉक करण्याचे सांगितले मात्र या वेळात अज्ञात व्यक्तीने सुमारे 98 हजार 600 रुपये त्यांच्या खात्यातून काढून पाटील यांची फसवणूक केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !