वादळी पावसाने सावतर-निंभोरा शिवारात शेतकर्‍यांची पिके वाहिली


Stormy rain washed away farmers’ crops in Savatar-Nimbhora Shivar भुसावळ  : गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसामुळे सावतर निंभोरा, ता.भुसावळ शिवारातील तापी नदी किनार्‍यावरील शेतकर्‍यांची पिके जमिनीसह वाहिल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

मध्यप्रदेश व विदर्भात झालेल्या दमदार पावसानंतर हतनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आल्यानंतर तापी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला. तापी नदी किनार्‍यालगत असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतामध्ये नदीचे पाणी शिरल्याने तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने शेतकर्‍यांची पिकासह जमीन वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या शेतकर्‍यांना सर्वाधिक फटका
सावतर शिवार गट नंबर एक व अकरामध्ये सुरेश कोळी, गट नंबर दोनमध्ये कमलाकर चौधरी, गट नंबर चारमध्ये मधुकर कोळी, गट नंबर पाचमध्ये दामू महारु कोळी, गट नंबर सहा गणेश ईच्छाराम झोपे, गट नंबर 11 प्रकाश लक्ष्मण कोळी, गट नंबर बारा मधुकर इंगळे, गट नंबर 13 सुनील कोळी, गट नंबर 14 शांताराम कोळी, गट नंबर 14 दशरथ सावटे, गट नंबर 15 नामदेव ठाकरे , गट नंबर 15 शांताराम सोनवणे यांच्या शेतातील कपाशीसह केळी, तूर, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !