चार उपजिल्हाधिकार्‍यांसह आठ तहसीलदार निलंबित : नेमके कारण वाचून घ्या


Eight Tehsildars suspended along with four Deputy Collectors मुंबई : बदलीनंतर ठरावीक वेळेत रुजू न होणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना नेहमीच इशारा दिला जातो मात्र त्यानंतरही काही अधिकारी बदलीच्या ठिकाणी रूजूच होत नसल्याने आता या अधिकार्‍यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न झालेल्या महसूल विभागातील आठ तहसीलदार व चार उपजिल्हाधिकार्‍यांना निलंबित करण्यात आल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईच्या या दणक्यानंतर रूजू न झालेले अधिकारी तत्काळ बदलीठिकाणी रूजू झाल्याचीही माहिती आहे.

या अधिकार्‍यांवर निलंबन कुर्‍हाड
नागपूर विभागात रुजू न झालेल्या सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आले. त्यात सरेंद्र दांडेकर (धानोरा, गडचिरोली), विनायक थविल (वडसादेसागंज, गडचिरोली), बी. जे. गोरे (एटपल्ली, गडचिरोली), सुनंदा भोसले (नागपूर), पल्लवी तभाने (वर्धा), बालाजी सूर्यवंशी (अपर तहसीलदार, नागपूर), तर नाशिक विभागातील सुचित्रा पाटील (करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक) तसेच यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंह मोहिते यांचेही निलंबन करण्यात आले.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !