सलग 21 दिवस पावसाचा खंड पडलेल्या भागात शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत देणार !

पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर कृषी मंत्र्यांचे निर्देश


Farmers will be given 25 percent advance compensation till Diwali in areas where there is no rain for 21 consecutive days! जळगाव : खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील 27 महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले आहेत. त्यांना नुकसान भरपाईच्या 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत देण्याचे आदेश कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी मुबंई येथील बैठकित दिले. जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी केली होती. त्यावर कृषीमंत्र्यांनी तात्काळ आदेश काढले आहेत. त्यामुळे पात्र शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

25 टक्के भरपाई मिळणार
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते की पंतप्रधान पिक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा सुमारे 27 महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्हयातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकर्‍यांना विम्याच्या निकषाप्रमाणे 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तात्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत.

यांची होती उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या या पत्रनुसार कृषी मंत्री धनजंय मुडे यांनी मुंबईत मंत्रालय बैठक आयोजित केली होती, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुकुमार यादव, व कृषी आयुक्त सुनील चव्हाण , पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील उपस्थित होते.

शेतकर्‍यांसाठी सरकार प्रयत्नशील
याप्रसंगी कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी तातडीने निर्देश दिले की, राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांमध्ये पात्र झालेल्या 27 महसूल मंडळांतील पात्र शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई विमा निकषाप्रमाणे देय असून, पात्र महसूल मंडळांबाबत तत्काळ अधिसूचना निर्गमित करण्याबाबतच्या सूचना यावेळी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या. दिवाळीपर्यंत ही रक्कम शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.शेतकर्‍यांची दसरा दिवाळी शेतकरी सुखी होवो म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकार्‍यांशी साधला संवाद
दरम्यान, याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यांशी प्रत्यक्ष दूरूध्वनीद्वारे गुरुवारी बोलणे झाले. यापूर्वीच याबाबत जिल्ह्यातील महसूल मंडळांची अधिसूचना काढण्यात आली असून जिल्हा प्रशासन शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्यासाठी कटीबध्द असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हा पीक विमा व शेतकरी समितीचे सी.ए.हितेश आगीवाल व मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे हेही उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !