वाचनाची गोडी वाढविण्यासाठी वाचन कट्टा उपक्रम
थोरगव्हाण जिल्हा परीषद शाळेच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक
यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वाचण्याची गोडी लागावी म्हणून शाळेत वाचन कट्टा उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. उद्घाटन शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे यांचा हस्ते करण्यात आले. थोरगव्हाण जिल्हा परीषद शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र देवरे, उपशिक्षक निलेश पाटील, एकनाथ सावकारे व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेत मुलांना शिक्षणाची व वाचण्याची गोडी निर्माण व्हावी या हेतुने वाचन कट्टा व बाल आनंद मेळाव्याची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उपक्रमास उत्तम प्रतिसाद
वर्तमानपत्र, विविध देशभक्ती, सांस्कृतिक व धार्मिक पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.या कार्यक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शाळेत आठवडे बाजार भरवला. यात गावातील पालक व महिला यांनी विविध भाजीपाला व खाद्य पदार्थ खरेदी करून विद्यार्थाना खरेदी-विक्री करण्याची सवय मिळाली व चांगला प्रतिसाद मिळाला.



यांची कार्यक्रमास उपस्थिती
सरपंच उमेश सोनवणे, माजी उपसंरपच समाधान सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निवृती चौधरी, पत्रकार गोकुळ कोळी, विनोद भालेराव, विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भालेराव, गोपाळ चौधरी, पद्माबाई पाटील, सुरेश चौधरी, जीवन पाटील, चेतन पाटील, सोपान पाटील, दिवाकर चौधरी, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील, नवल सोनवणे, योगेश कोळी, सतीश गांवडे, संजय चौधरी उपस्थिती होती. प्रास्ताविक निलेश माधवराव पाटील तसेच आभार निलेश धर्माराज पाटील यांनी मानले.
