भुसावळातील दत्तनगरातून सेल्समनची दुचाकी लांबवली
A salesman’s bike was extended from Dattanagar in Bhusawal भुसावळ : शहरात दर दिवसाला दुचाकींची चोरी होत असल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. कामानिमित्त दत्त नगरात आलेल्या सेल्समनची 28 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार सोमवार, 18 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवघ्या काही क्षणात चोरट्यांकडून काम फत्ते
चेत्या प्रकाश सपकाळे (25, वाल्मीक नगर, कानळदा, ता.जळगाव) हे सेल्समन असून सोमवारी ते भुसावळात दुचाकी (एम.एच.19 बी.एच.8036) ने आल्यानंतर कामानिमित्त दत्त नगर, गजानन मंदिराज मंदिराजवळ आले असता काही वेळात चोरट्यांनी संधी साधून त्यांची दुचाकी लांबवली. याप्रकरणी सपकाळे यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.








