रावेर शहरातील अल्पवयीन मुलीला पळवले
रावेर : शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एका भागात 13 वर्षीय पीडीता परीवारासोबत वास्तव्यास आहे. शनिवार, 23 रोजी दुपारी अडीच वाजता अज्ञातांनी अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून व फूस लावून पळवून नेले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.








