आचार, विचार आणि उच्चार ही त्रिफळी म्हणजे माँ नर्मदा परीक्रमा : डॉ.नि.तु.पाटील


Maa Narmada Parikrama is tripartite behavior, thought and speech : Dr.N.Tu.Patil भुसावळ  : माँ नर्मदा परीक्रमा करत असतांना आपला आचार हा धार्मिक असतो, विचार हे सात्विक असतात आणि मुखात मातेच्याच नामस्मरणाचे उच्चार असतात त्यामुळे जवळपास तीन हजार 609 किलोमीटर पायी चालत असतांना मातेचं नामस्मरण करोडोच्या संख्येने होते, असे अनुभव परीक्रमवासी डॉ. नितु पाटील यांनी जळगाव आयएमए हॉल याठिकाणी कथन केले.

नर्मदा परीक्रमेबद्दल जळगावात सत्कार
जळगाव आयएमए गणेशोत्सव 2023 च्या निमित्ताने नर्मदा माता परीक्रमा अनुभव कथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ.सुनील नाहाटा, सचिव डॉ.तुषार बेंडाळे उपस्थित होते. परीक्रमवासी डॉ.नितु पाटील यांचा सत्कार आयएमएचे अध्यक्ष डॉ.नाहाटा यांच्याहस्ते शाल, नारळ देऊन झाला. तसेच जळगाव नेत्र संघटनेमार्फत डॉ.रागिणी पाटील यांच्याहस्ते देखील सत्कार झाला.

डॉ.नि.तु पाटील म्हणाले की, आगामी काळात नर्मदा परीक्रमा अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचे काम माझे वर्गमित्र सुश्रुत जळूकर यांनी हाती घेतले असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल. यावेळी जळगाव आयएमए पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.तुषार बेंडाळे तर आभार डॉ.भरत बोरोले यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !