भुसावळ नगरपालिकेचे गोठवलेले खाते होणार सुरू : आदेशाला खंडपीठाने दिली स्थगिती
Frozen accounts of Bhusawal Municipality to be opened: Bench stayed the order भुसावळ : भुसावळ पालिकेचे 14 व्या व 15 व्या वित्त आयोगाचे खाते एका प्रकरणात सील करण्यात आले मात्र खंडपीठात पालिकेने धाव घेतल्यानंतर या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर पालिकेचे खाते सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंडारी शिवारातील सर्व्हे नंबर 194/ 1 व 196 या जमिनीवरील 24 मीटर डीपीरोड पालिकेने जागेचा वापर केल्याचा दावा करीत देवेंद्र यावलकर व इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर चार कोटी 50 लाख 30 हजार 751 रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले मात्र रक्कम भरण्यात न आल्याने 14 व 15 व्या वित्त आयोगाचे बँक खाते सील झाल्याने पालिकेच्या अडचणीत वाढ झाली होती तर विकासकामे करताना अडचणी वाढल्या होत्या.
लवकरच सील खाते उघडणार
सर्वोच्च न्यायालयात पालिकेने धाव घेतल्यानंतर खंडपीठाने आदेशाला स्थगिती दिली तर तूर्ततरी चार कोटी 50 लाख 30 हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार नाही व सील खाते उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी यावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने दिलासा मिळाला तर पालिकेतर्फे अॅड.पालोदकर व अॅड.निर्मल दायमा यांनी कामकाज पाहिले.


