भुसावळातील स्वच्छतेच्या तक्रारी अर्ध्या तासात सोडवा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : घंटागाड्यांचे लोकार्पण : स्वच्छतेची पाहणी


Resolve sanitation complaints in Bhusawal within half an hour भुसावळ: शहरात पालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या संदर्भातील तक्रारींचे निवारण 24 तासांत नव्हे तर केवळ 30 मिनिटांत व्हायला हवे, अशी आशा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या उपस्थितीत बुधवारी शहरातील प्रांताधिकारी, तहसील व पालिका कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

शहरातील सर्व कामांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे बुधवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयात आगमन झाले. प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी बोदवड व भुसावळ तालुक्यात झालेला परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान व विविध शासकिय कामांचा आढावा घेतला. यानंतर सायंकाळी तहसीलदार कार्यालयात विविध शासकिय योजना व कामांचा आढावा घेतला.

तहसील व प्रांत कार्यालयातील स्वच्छतेबाबत समाधान
तहसील व प्रांताधिकारी कार्यालयातील स्वच्छता चांगली असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जळगावरोडवरील दुभाजकात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते पालिकेचा स्वच्छता तक्रार निवारण कक्ष व दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान कक्षाचे उद्घाटन तसेच 11 घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

शहरात स्वच्छतेचे काम समाधानकारक असून ते अधिक गतीमान व्हावे. तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून 24 तासांत नव्हे तर केवळ 30 मिनिटांत तक्रारी निवारण केल्या जाव्यात, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे आदींसह पालिकेचे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !