शारीरीक व्याधींपासून मुक्तता म्हणजे माँ नर्मदा परीक्रम : डॉ.नि.तु.पाटील
Freedom from physical ailments is Maa Narmada Parikrama : Dr.N.Tu.Patil भुसावळ : मला मधुमेहाचा त्रास होता मात्र परीक्रमा सुरू केल्यापासून 108 दिवसात एकही दिवस डायबेटीसची गोळी घेतली नाही, आता घरी आल्यावर रक्त तपासले असता रक्तातील साखरेची पातळी ही अगदी बरोबर होती. ही किमया फक्त माँ नर्मदा परीक्रमेच घडू शकते, असा स्वानुभव परीक्रमावासी डॉ. नि.तु.पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी संघटनेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात कथन केला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
शहरातील प्रभाकर हॉलमध्ये शहरातील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी संघटनेच्या वतीने डॉ.नि.तु.पाटील यांचा सत्कार आणि माँ नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर रोटरी अध्यक्ष मनोज सोनार, सचिव तेजस नवगाळे उपस्थित होते.

वजन घटले व शुगर लेव्हल आली नियंत्रणात
डॉ.नितु पाटील म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये मी कोरोना संक्रमित झालो. शारीरीक स्थिती अवघड झाली होती. भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्यावर त्या ठिकाणी मी सात रेमेडीसीवर इंजेक्शन घेतले त्यामुळे आजार गेला पण मला डायबिटीस लागला. रक्तातील साखरेचे प्रमाण हे 200 च्या पुढे रहायचे, त्यामुळे औषधी सुरू झाल्या तेव्हा आयुष्यभर आता डायबेटीस आपला सोबती राहणार हे मी मनोमन ठरवले होते. माँ नर्मदा परीक्रमा सुरू करतांना सोबत जवळपास तीन महिन्यांची औषधी सोबत घेतली पण एकही दिवस औषधी घेतली नाही, शेवटी ओझं कमी करावे म्हणून सर्व औषधी फेकून दिली. घरी परतल्यावर वजन हे 13 किलोने कमी झाले तर रक्तातील साखरेचे प्रमाण हे अगदी बरोबर सामान्य आले. ही जादू फक्त माँ नर्मदा माता आणि परिक्रमा यातच आहे. यावेळी डॉ.समीर चौधरी, डॉ नीतीन दावलभक्त, सोनू मांडे, डॉ.मकरंद चांदवडकर, नितीन धांडे, विशाल शाह, हरमित सिंगमाथन, पुरुषोत्तम पटेल, डॉ.गिरीश शास्त्री, श्रीकांत जोशी आदी सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज सोनार, परीचय डॉ. समीर चौधरी, आभार तेजस नवगाळे यांनी मानले.

