भुसावळात तेरापंथ युवक परीषदेतर्फे रक्तदान शिबिर : 111 दात्यांनी केले रक्तदान


भुसावळ : शहरातील तेरापंथ युवक परीषदेतर्फे रविवारी सकाळी 10 वाजता रक्तदान शिविराचे आयोजन तेरापंथ भवनात करण्यात आले होते. शिबिराचा शुभारंभ साध्वीश्री संवेगनिधीजी म.सा.च्या आशीर्वादाने करण्यात आली. या शिबिरात 111 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरात मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची उपस्थिती होती.

शिबिर यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
शिबिर शस्वी करण्यासाठी तेरापंथ सभेचे रवींद्र निमाणी, गल्लूदास छाजेड, महेंद्र कोठारी, प्रवीण छाजेड, संजय चोरडिया, आदेश सांखला, प्रमोद छाजेड़, युवक परिषदचे देवेंद्र निमाणी, अभय छाजेड, अंकुश चोरडिया, सोमेश सांखला, ऋषभ कोठारी, पंकज छाजेड, अमित निमाणी, मनोज कोटेचा यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमात सहभागी राजेश सुराणा, सुपात्र दान युवा मंचचे देवेंद्र मेहता यांचे योगदान मिळाले. या कार्यक्रमाला आमदार संजय सावकारे आणि गोदावरी कॉलेजच्या केतकी पाटील यांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !