सरकारी योजनांचा नुसताच भुलभुलैय्या ; भुसावळकर नागरीकांची सरकारवर टिका

शिवसेनेतर्फे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमात रोजगारासह महागाईवर नागरीकांची टिका


Just a maze of government schemes ; Criticism of Bhusawalkar citizens on the government भुसावळ  : भाजपा सरकारतर्फे नागरीकांसाठी विविध योजना अंमलात आणण्यात आल्या असल्यातरी प्रत्यक्षात त्याचा लाभ जनतेला मिळत नसल्याची खंत नागरीकांनी शिवसेना गटाने आयोजित केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमात व्यक्त केली. नाहाटा चौफुलीवर गुरुवारी सकाळी 10 वाजता कार्यक्रमास सुरूवता झाली. बस, रीक्षाने जाणारे प्रवासी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणांनी या चर्चेत उत्साहाने सहभाग नोंदविला. शिवसनेचे रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख विजय परब ( ुंबई) यांनी लोकांना महागाई, नोकरी, शिक्षण, डिझेल, पेट्रोल बाबतीत प्रश्न विचारल्यानंतर नागरीकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली.

शासन योजनांचा नुसताच भुलभुलैय्या
शहरातील गवळी वाडा, वसंत टॉकिज, पांडुरंग टॉकिज, अष्टभुजा देवी मंदिराजवळ चर्चा झाली. उपस्थित शेतकर्‍यांनी आम्हाला शासनाची कोणतीही आर्थिक मदत झाली नसल्याचे सांगत खात्यावर पैसे आले नसल्याचे सांगितले तसेच दुष्काळातही काहीच मदत मिळाली नसल्याचे सांगितले तर महिलांनी सुद्धा या चर्चेत भाग घेतला. अखेरचा कार्यक्रम खडका रोड, रजा टॉवरजवळ झाला.

वाढत्या महागाईबाबत जनतेत रोष
शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मंजूर, ठेकेदार, रीक्षा चालक, फळभाजी विक्रेते यांनी महागाई, बेरोजगारी, शिक्षण, रोड, साफसफाई आदी अनेक बाबतीत भाजप सरकारवर टिका केली. महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅस, आदी अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने जनजीवनावर परीणाम झाल्याचे नागरीकांनी बोलून दाखवले.

यांचा कार्यक्रमात सहभाग
शिवसेनेच्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमात रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख विजय परब (मुंबई), माने, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख विलास मुळे, तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख दीपक धांडे, बबलू बर्‍हाटे, दिलीप सुरवाडे, स्वप्नील सावळे, यश फालक, पिंटू भोई, शरद जयस्वाल, राकेश खरारे, नरेंद्र लोखंडे, जितू पाटील, सोनी ठाकूर, मनोज पवार, महमूद शेख, अमजद खान, नबी पटेल, मकबूल मेंबर, अरुण साळुंके व आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !