चितोडा गावातील तरुणास आत्महत्या प्रवृत्त करणार्‍या पाच संशयीतांना बेड्या

आरोपींना न्यायालयाने सुनावली एका दिवसांची पोलिस कोठडी


Five suspects who instigated the suicide of a youth of Chitoda village, are in shackles यावल : यावल तालुक्यातील चितोडा येथील 23 वर्षीय तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व पाच संशयीतांना यावल पोलिसांनी गुरूवारी अटक केली. या सर्वांना यावल न्यायालयात हजर केले असता सर्व पाच संशयीतांना न्यायलयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मानसिक त्रासातून तरुणाची आत्महत्या
चितोडा, ता.यावल येथील दुर्गेश संतोष किनगे (23) या तरुणाला गावातील रजनी भास्कर जंगले, भास्कर आनंदा जंगले, रेखा भूषण जंगले, भूषण भास्कर जंगले व ज्ञानेश्वर भास्कर जंगले (सर्व राहणार चितोडा, ता.यावल) या पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती व तू गाव सोडून निघून जा, तू जर गेला नाही तर आम्ही तुला सोडणार नाही, असे सांगून त्याला दम दिला होता व सातत्याने हे पाच जण त्याला त्रास देत होते. आरोपींच्या जाचाला कंटाळून दुर्गेश किनगे याने दिनांक 28 सप्टेंबर रोजी देविदास तुकाराम पाटील (चितोडा) यांच्या शेत गट क्रमांक 557 मधील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.



आरोपींना एका दिवसाची कोठडी
याप्रकरणी संतोष किनगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात चतोडा येथील पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचही संशयितांना गुरूवारी अटक केल्यानंतर त्यांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता या सर्व पाच जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तास पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !