सुरवाडा येथील विवाहितेची आत्महत्या : संशयित आरोपींचा अटकपूर्व मंजूर
Suicide of married woman in Surwade : Pre-arrest of suspected accused approved बोदवड : बोदवड तालुक्यातील सुरवाडा येथील विवाहितेने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी पती शिवाजी एकनाथ शिंदे, जेठ किशोर एकनाथ शिंदे, सासरे एकनाथ पांडू नामदेव शिंदे, नणंद सुरेखा देव पाटील, नणंद वंदना प्रकाश पाटील या सहा लोकांविरुद्ध विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापैकी सासू, सासरे व दोन्ही नणंद यांचा अटकपूर्व जामीन भुसावळ येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांच्या न्यायासनाने प्रत्येकी पंधरा हजारांच्या जात मुचलक्यावर मंजूर केला आहे. संशयित आरोपींतर्फे अॅड.अर्जुन टी.पाटील (बोदवड) व अॅड.धनराज सी.प्रजापती यांनी काम पाहिले.


