शिक्षक मतदारसंघात नाव नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर अखेरची मुदत


यावल : यावल तहसील कार्यालयामध्ये नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणीचे काम सुरू झाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वीची शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी रद्द करून आता नव्याने मतदार नोंदणी सुरू झाली आहे. शुक्रवार, 6 नोव्हेंबरपर्यंत तहसील कार्यालयात शिक्षकांना मतदार यादीत आपले नाव नोंदता येणार आहे.

आज नोंदणीसाठी अखेरची मुदत
यावल यतहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेमध्ये नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणीचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी आता तालुक्यातील शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी तयार केली जात आहे. आगामी नाशिक विभागीय मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वी असलेली शिक्षक मतदार संघाची मतदार यादी रद्द करण्यात आली आहे व केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने नव्याने पुन्हा मतदार यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी, पराग सरोदे यांच्या वतीने शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. यामध्ये शिक्षकाने किमान सहा वर्षांपैकी तीन वर्ष सेवा दिलेली असल्यास त्याची माहिती सादर करून मगच त्यांना शिक्षक मतदारसंघात आपले नाव नोंदता येणार आहे. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेची संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !