यावलला किरकोळ कारणावरून दोघांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला ; दोघे गंभीर
Two assaulted each other for a minor reason ; Both serious यावल : शहरातील बोरावल गेट जवळील धनगर वाड्यात किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या घटनेत एका 61 वर्षीय इसमाने 58 वर्षीय इसमावर चाकूने हल्ला केला तर प्रतिउत्तरात 58 वर्षीय इसमाने देखील 61 वर्षीय वृद्धाला डोक्यात आणि हातावर दुखापत केल्याने हात मोडला आहे. हाणामारीनंतर दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
हाणामारीत मोडला हात
यावल शहरातील बोरावल गेट भागात शुक्रवारी सायंकाळी प्रभाकर आनंदा धनगर (58) हे एका दुकानावर बसले होते. त्या ठिकाणी रामा ढाके (61) हे आला आणि दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यात रामा ढाके यांनी प्रभाकर धनगर यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला तर प्रतिउत्तरात धनगर यांनी देखील एका लोखंडी रॉडने रामा ढाके यांच्या डोक्यावर वार केले आणि हातावर वार केल्याने डावा हात मोडला गेला.


दोघांना जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, डॉ. इरफान खान, अधिपरीचारीका माधुरी ठोके, संजय जेधे,रऊफ खान आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता हलवण्यात आले आहे. सहायक फौजदार असलम खान, रोहिल गणेशसह आदींनी घटनास्थळी भेट देत शांतता प्रस्थापीत केली.
