लाकडांची अवैध तस्करी : ट्रकसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त


Illegal smuggling of timber: Goods worth three lakhs seized along with trucks रावेर : वनविभागाच्या पथकाने अवैधरीत्या लाकडांची होणारी तस्करी रोखत ट्रकसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने तस्करांमध्ये खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शुक्रवार, 6 रोजी वन अधिकारी यावल पूर्व, आगार रक्षक, फैजपूर व वनरक्षक जानोरी हे शासकीय वाहनाने यावल ते फैजपूर गस्त करीत असता फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाजवळ पंचरास जळावू लाकूड विनापरवाना अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक (क्र.एम.पी.09 के.सी 5559) अडवता असता त्यात पंचरास इफेक्ट-19:00 घन मिटर माल मिळून आला. त्यांची अंदाजे किंमत 26 हजार 600 व वाहनाची अंदाजे किंमत तीन लाख 30 हजार रुपये आहे.



दरम्यान, वाहन चालक शेख अन्वर शेख कडू (खानापूर, ता.रावेर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, आगार रक्षक सतीश वाघमारे, वाहन चालक विनोद पाटील यांनी संयुक्तरीत्या केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !