भुसावळातील अतिक्रमण धारकांंना दिलासा : अतिक्रमण निर्मूलन मोहीम लांबणीवर
दसरा, दिवाळीत कारवाई न करण्याची आमदार संजय सावकारे यांची सूचना
Relief to encroachment holders in Bhusawal: Extension of encroachment removal scheme भुसावळ : भुसावळ पालिकेने शहरातील अतिक्रमणधारकांना शुक्रवारी तोंडी सूचना देवून आठवडेभरात अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम दिला मात्र आगामी काळात सण-उत्सव असल्याने हातावर पोट भरणार्या विक्रेत्यांवर कुर्हाड कोसळणार असल्याने वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवावे किंवा अत्यावश्यक आहे, असेखच अतिक्रमण काढावे मात्र बाजारातील विक्रेत्यांवर किमान दिवाळीपर्यंत कारवाई करू नये. शा सूचना आमदार संजय सावकारे यांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना दिल्या. यामुळे तूर्ततरी अतिक्रमण हटविले जाणार नाही, असे चित्र आहे.
बाजारातील अतिक्रमण न हटवण्याची सूचना
भुसावळ शहरात पालिकेने शुक्रवारपासून अतिक्रमणधारकांना आठवडेभराचा अल्टीमेटम दिला होता. आठवडेभरात अतिक्रमणे हटवा अन्यथा कारवाईची निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे रस्त्यावरील हातगाडी, टपर्यांमधून व्यवसाय करणार्यांमध्ये भीती पसरली होती. या प्रश्नी आमदार संजय सावकारे यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. आगामी काळात सण उत्सव आहेत. रस्त्यावरील विक्रेत्यांचा संसार त्यांच्या व्यवसायावरच चालतो. यामुळे किमान दिवाळीपर्यंत तरी अतिक्रमणधारकांवर कारवाई करू नये. या काळात अत्यंत आवश्यक असलेले किंवा वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले तरी हरकत नाही मात्र इतरांवर कारवाई नको तसेच मुख्य बाजारपेठेतही तूर्त अतिक्रमणधारकांवर कारवाई करू नये, याबाबतची चर्चा आमदार सावकारे यांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्यासोबत केली. वाघमोडे यांनीही शहरवासीयांच्या भावना समजून व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कारवाई टाळण्याचे संकेत दिले आहेत मात्र सण उत्सवात रस्त्यांवर वाहतूकीस अडथळा होणार नाही. दुकानदारांकडून स्वच्छता ठेवली जाईल, अशा अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

रस्त्यावरील अडथळा हटविणार
शहरात सध्या सरसरकट अतिक्रमण धारकांवर कारवाई होणार नाही, असे संकेत असले तरी अत्यंत आवश्यक अर्थात इर्मजन्सीने काढले पाहिजे, असे अतिक्रमण तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण होईल व पादचार्यांनाही चालता येणार नाही, असे अतिक्रमण मात्र काढले जाणार आहे. विक्रेत्यांनीही गैरवापर न करता कमीत कमी जागेत व्यवसाय करावा, विक्रेते रस्त्यांवर फलक ठेवूनही अतिक्रमण करतात, असे फलकही पालिकेने जप्त करावे तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचा सूर उमटत आहे.

