नर्मदा परीक्रमेतही आली देशाच्या डिजीटल क्रांतीची अनुभूती
डॉ.नि.तू.पाटील यांची वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघात माहिती
The feeling of the country’s digital revolution also came in Narmada Parikrama भुसावळ : नर्मदा परीक्रमा करतांना भारतातील डिजिटल क्रांतीने कसा इतिहास घडवला आहे हे साक्षात अनुभवण्याची संधी मिळाते. अतिदुर्गम डोंगराळ, रानावनाच्या भागातही ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी भावना नर्मदा परीक्रमावासी तथा वरणगाव येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नि.तु.पाटील यांनी व्यक्त केली. वेडी माता ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ आयोजित माझी नर्मदा परिक्रमा मनोगतपर कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर अध्यक्ष रामदास खर्चे, सचिव दिलीप पाटील, उपाध्यक्ष बी.एस.पाटील, खजिनदार भागवत सपकाळे, वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष धनराज पाटील आदी उपस्थित होते. डॉ.नि.तु.पाटील यांचा सत्कार माजी नगरसेवक वसंत पाटील यांनी केला. सतीश जंगले यांनी परीचय दिला.

609 किलोमीटरच्या प्रवासात मोबाईलची रेंज
डॉ.पाटील म्हणाले की, माता नर्मदा परीक्रमा करतांना तुम्हाला रोख रुपये वापरण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये डिजिटल रुपये हस्तांतरण अँप असेल तरी तुमचे सर्व व्यवहार व्यवस्थित होतात. विशेष म्हणजे जंगलात, दर्या खोर्यात, अति दुर्गम भागात देखील दुकानदार हे आपल्या दर्शनी भागात क्यूआर फोटो लावून त्यावर व्यवहार करा, असे सांगतात तसेच अश्या भागात शासकीय सेवा केंद्रदेखील असल्याने जनतेस शासकीय दाखले हे घरबसल्या मिळतात. संपूर्ण तीन हजार 609 किलोमीटरच्या प्रवासात मोबाईलची रेंज मिळाली. यामुळे संपर्क साधता येतो तसेच आर्थिक व्यवहार करता येतात सोबतच सोशल मीडियाद्वारे तुमचे दर दिवसाचे अनुभव इतरांना सहज शेअर करता येतात त्यामुळे आपण जरी परीक्रमा करत असलो तरी घरचे निवांत राहतात कारण सतत संपर्क असतो. मागील 10 वर्षातील डिजिटल क्रांती अनुभवायची असेल तर नर्मदा परीक्रमा अवश्य करा,असे विविध ठळक अनुभव डॉक्टरांनी कथन केले. जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन भागवत सपकाळे तर आभार प्रदर्शन दिलीप पाटील यांनी मानले.

