प्रा. भूवनेश्वरी राणे यांना पीएच.डी.पदवी प्रदान
भुसावळ : साकेगाव येथील कै.यशोदाबाई दगडू सराफ चॅरीटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्रा.भुवनेश्वरी योगेश राणे यांना जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी पीएच.डी. पदवीने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
समुद्र फळांमध्ये न्युरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहे हे त्यांनी संशोधन केले. हे संशोधन हे प्रा.डॉ.व्ही.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा.डॉ.व्ही.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेटंट प्राप्त झाले तसेच ओर्गानिक केमिस्ट्री या विषयावर पुस्तक लिहिले आहे. या शोधनिबंधासाठी मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर येथील प्राचार्य प्रा.डॉ.आर.वाय.चौधरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कै.यशोदाबाई दगडू सराफ चॅरीटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव येथील प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
