वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संवाद दौर्‍यास प्रतिसाद


भुसावळ : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात युवा संवाद दौरा आयोजित करण्यात आला. मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यांची प्रसंगी उपस्थिती
युवा संवाद दौर्‍यानिमित्ताने मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील युवा आघाडी शहर व तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी युवा आघाडीचे जिल्हा निरीक्षक चेतन गांगुर्डे व जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुकांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.
याप्रसंगी युवा आघाडीचे जिल्हा महासचिव शुभम आसलकर, संघटक जगन गुरचळ, बेबो ताई, मनीष वाकोडे, जिल्हा सचिव मोहन पाटील, शाहरुख शहा, सद्दाम कुरेशी, प्रतीक दामोदरे, दीपक कोंघे यासह सर्व जिल्हा पदाधिकारी,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !