टेंभी शेत शिवारात महिलेचा विनयभंग


Woman molested in Tembhi Shet Shivar यावल : यावल तालुक्यातील टेंभी शेत शिवारात रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा माथेफिरून अंगावरून कपडे काढून नग्न होत विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
टेंभी, ता.यावल शेत-शिवारात सार्वजनिक रस्त्यावर एक 35 वर्षीय महिला शेतात काम करीत असताना यावल शहरातील शेख आलिम शेख सलीम (इस्लामपुरा) याने महिला व तिच्या सोबत असलेल्या इतर महिलांना बघून आपल्या अंगावरील संपूर्ण कपडे काढत महिलांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !