यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर 50 वर्षीय नराधमाचा अत्याचार : आरोपीला अटक


A 50-year-old murderer assaulted a minor girl in Yaval taluka : The accused was arrested यावल : यावल तालुक्यातील खालकोट येथील एका 50 वर्षीय इसमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या संशयीतास सातपुड्याच्या जंगलातील गाडर्‍या परीसरातून अटक केली. संशयिताला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पीडीतेचा कुटूंबियांकडे ताबा
पीडीत बालिकेस कुटुंबीयास सोपवण्यात आले. खालकोट, ता.यावल येथील सुकलाल टकल्या बारेला (50) या नराधमाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी पीडीत मुलीच्या पालकांनी यावल पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या पथकाने सुकलाल बारेला याला सातपुड्याच्या वनराईत गाडर्‍या येथून ताब्यात घेतले व अल्पवयीन मुलीची वैद्यकिय तपासणी केली असता तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने या गुन्ह्यात बालकांचे लैगींक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले. संशयीत 50 वर्षीय या नराधमाला जळगाव येथील विशेष बाल न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार श्याम धनगर करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !