फॉरेस्ट वाल्यांना टीप दिल्याच्या संशयातून पाडळसा गावातील तरुणाला मारहाण


A young man from Padalsa village was beaten up on suspicion of giving a tip to forest guards यावल : यावल तालुक्यातील भोरटेक शिवारात पाडळसा येथील 31 वर्षीय तरुणाला पाडळसा येथील दोघांनी तू फॉरेस्ट वाल्यांना टिप देतो, असे सांगत मारहाण करीत डोक्यावर लोखंडी वस्तुने दुखापत करण्यात आली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
भोरटेक, ता.यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार समितीच्या आवारात ज्ञानेश्वर वनराज कोळी (पाडळसा) हा 31 वर्षीय तरुणाला भरत घनश्याम चौधरी व योगेश उर्फ गोलू संजय पाटील (पाडळसा, ता.यावल) यांनी तू फॉरेस्ट वाल्यांना टिप देतो, असे सांगत मारहाण केली व लोखंडी वस्तूने त्याच्या डोक्यात प्रहार केला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर कोळी याच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोकुळ तायडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !