बामणोद येथे विवाहितेचा विनयभंग ; वाघोद्यातील संशयिताविरोधात गुन्हा
Matrimonial rape at Bamanod ; Crime against the suspect in Waghoda यावल : यावल तालुक्यातील बामणोद येथे एका 35 वर्षीय विवाहितेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश महिलेच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली तसेच महिलेचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरोधात फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल
वाघोदा, ता.रावेर येथील शुभम वाघ याने बामणोद येथील 35 वर्षीय महिलेच्या घरात जाऊन तिच्या पतीच्या संदर्भात विचारणा केली. महिला स्वयंपाक करत असतांना त्याने तिच्या पतीला शिवीगाळ केली आणि महिलेचा उजवा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळू भोई करीत आहे.


