साकरी फाट्याजवळ अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह
The body of an unknown person was found near Sakari Phata भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील साकरी फाट्याजवळ इंडियन ऑइल कंपनी पेट्रोल पंपाच्या मागे एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी आढळून आला. मृतदेहाची माहिती मिळतात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
सुमारे दोन ते तीन दिवसापासून हा मृतदेह तेथे पडला असावा असा पोलिसांचा कयास आहे. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून अंगावर कोठेही जखमा नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शनिवारी मृतदेहाचे विच्छेदन होणार आहे. अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाविषयी कोणाला माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
