भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयातर्फे मतदार नोंदणी अभियानांतर्गत जनजागृती रॅली


भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासन महसूल विभागांतर्गत मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त महाविद्यालयातर्फे जनजागृती प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध सूचना फलक व स्लोगन लिहिलेले पोस्टर हातात घेऊन प्रबोधन केले. याबरोबर महाविद्यालयाने भुसावळ तहसीलदार यांच्या सहकार्याने व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.आर.पी.फालक यांच्या मार्गदर्शनखाली मतदार नोंदणी जनजागृती अभियान कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवितांना वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी फॉर्म भरून प्रोत्साहन दिले. जनजागृतीसाठी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.आर.पी.फालक यांनी संबोधित करतांना भारतीय लोकशाही मध्ये मतदाराचा हक्क आणि अधिकार काय आहे याबाबत माहिती दिली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी सूचना फलक हातात घेऊन वेगवेगळ्या घोषणा देत परीसरातील लोकांमध्ये मतदार नोंदणीविषयी उत्साह निर्माण केला.

या रॅलीचे प्रतिनिधीत्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केल्याचे प्रसिद्धीप्रमुख डॉ.संजय चौधरी कळवितात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !