भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात 17 रोजी राष्ट्रीय परीषद
National Council on 17th at Nahata College in Bhusawal भुसावळ : भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार, 17 रोजी ‘न्यू फ्रंटीयर्स इन बायोलॉजीकल सायन्सेस एनएफबीएस 2023’ या विषयावर राष्ट्रीय परीषद होत आहे.
आठ राज्यातील प्राध्यापकांचा सहभाग
भारताच्या आठ राज्यातील तसेच परदेशातीलदेखील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी राष्ट्रीय परीषदेत सहभागी होणार आहेत. या परीषदेचा विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, आणि धोरण निर्मात्यांना एकत्र आणून विषयाच्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांची आणि कल्पनांची देवाण-घेवाण करणे हा आहे. वर्गीकरण आणि विविधता या क्षेत्रातील अलीकडील संशोधन निष्कर्ष प्रकाशात आणणे आणि नवोदित शास्त्रज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

135 संशोधक आणि विद्यार्थी सहभागी होणार
हा कार्यक्रम तरुण संशोधक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात काम करणार्या नामवंत शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची उत्तम संधी ठरणार आहे. या संशोधन परीषदेत सुमारे 135 संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित राहतील. या परीषदेला प्रा.डॉ.एस.एम.गायकवाड (प्राणीशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) हे बीजभाषण करतील. राष्ट्रीय परीषदेसाठी स्पॉट रजिस्ट्रेशनदेखील केले जाणार आहे. जास्तीत-जास्त संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा तसेच प्राचार्य तथा परीषदेचे समन्वयक डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, परीषदेचे सचिव प्रा.डॉ.विद्या पाटील आणि प्रा.डॉ.मनोजकुमार जाधव, परीषद आयोजन समिती सदस्य प्रा.ज्योती जंगले, प्रा.धर्मेश बोरीकर, प्रा.रोहिणी पालवे, प्रा.स्वप्नील शहा, प्रा.कामिनी सपकाळे, प्रा.हर्षा धांडे, प्रा.उत्कर्षा पाटील, प्रा.वसीम शेख, प्रा.पौर्णिमा भारंबे, प्रा.अर्चना तळेले, संदीप पाटील, संदीप कोल्हे, भगवान पाटील, राजेश वाघुळदे, अनिल खडसे, संदीप पाटील यांनी केले आहे.

