भुसावळातील निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त


भुसावळ : भुसावळ तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी तहसीलदार निता लबडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. सोमवार, 16 ऑक्टोंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. तालुक्यातील चोरवड, सुनसगाव, फुलगाव, अंजनसोंडे, गोजोरे, विल्हाळे, वराडसीम, शिंदी, मांडवेदिगर, हतनूर येथील ग्राम पंचायतीची निवडणूक लागली आहे. हतनूर, मांडेवदिगर, शिंदी येथील ग्राम पंचायतीची पोट निवडणूक तर अन्य ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. पंचवार्षिक निवडणुकीसोबतच लोकनियुक्त सरपंचाची सुध्दा निवड होणार आहे. यात वराडसीम-जोगलखोरी येथील सरपंच अनुसुचित जमाती, फुलगाव- नागरीकांचा मागास वर्ग, अंजनसोंडे- सर्वसाधारण, विल्हाळे- अनुसूचित जमाती, सुनसगाव व गोजोरे सर्व साधारक महिला व चोरवड खेडी- सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

यांची केली नियुक्ती
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तहसीलदार निता लबडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहे. यात चोरवड, सुनसगावसाठी विस्तार अधिकारी संजय पाटील, फुलगाव- अनिल सुरडकर, अंजनसोंडे, गोजोरे- डी.आर.जयंकार, विल्हाळे- कपिल सुरवाडे, वराडसीम- किरण पाटील, शिंदी, मांडवेदिगर व हतनूरसाठी शाखा अभियंता प्रवीण भारंबे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !