आडगाव येथून घराबाहेर बांधलेली गाय लांबवली


A cow tied outside the house was extended from Adgaon यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथून घराबाहेर बांधलेली गाय लांबवण्यात आली. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

घराबाहेरून लांबवले पशूधन
आडगाव येथील रहिवासी रवींद्र एकनाथ पाटील या शेतकर्‍यांकडे गायी असून त्यांनी आपल्या गायी घराबाहेर त्यांना बांधून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर त्यांनी घराबाहेर बांधलेल्या गायींपैकी 15 हजार रुपये किंमतीची एक गाय अज्ञात चोरट्याने लांबवली. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. प्रारंभी आजुबाजूकडील परीसरात गायीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वासुदेव मराठे, नरेंद्र बागुले करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !