चुंचाळेतील प्रौढाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू
Death of an adult in Chunchale due to drowning in a well यावल : पाय घसरून विहिरीत पडल्याने चुंचाळेतील प्रौढाचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विठ्ठल प्रल्हाद धनगर (49, चुंचाळे) असे मयताचे नाव आहे.
विहिरीत आढळला मृतदेह
यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील विठ्ठल प्रल्हाद धनगर (49) यांचा शिवारातील यांच्या शेत विहिरीत दिनांक सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. ते गाव शिवारातील ग्रामपंचायतीच्या विहिरीवर पाणी भरत असताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात आले. याबाबत मयताचा पुतण्या किशोर अशोक धनगर यांनी यावल पोलिसाात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


दरम्यान, मयत विठ्ठल धनगर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी केले. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. तरमयत विठ्ठल धनगर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
