चुंचाळे येथील दुचाकी चोरी प्रकरण ; संशयितांना पोलिस कोठडी


Two wheeler theft case in Chunchale ; Suspects in police custody यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे येथून चोरी गेलेल्या दुचाकी प्रकरणी यावल शहरातील चार संशयीतांना पोलिसांनी अटक केली असून चौघांना मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता चौघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

चोरी प्रकरणी चौघांना बेड्या
चुंचाळे, ता.यावल येथील प्रकाश सीताराम धनगर यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.झेड.584) ही शेत गट क्रमांक 29/1 च्या बांधावरून चोरी गेली होती. ही दुचाकी यावल शहरातील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांना काढून दिल्यानंतर या गुन्ह्यातील संशयीत अर्जुन कुंभार, अशरफ तडवी, जावेद खान व सागर उर्फ उमेश सपकाळे या चौघांना पोलिसांनी अटक केली. मंगळवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्यासमोर हजर केले असता चौघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !