साकरी येथे खासदार, आमदारांच्या उपस्थितीत विकासकामांचे भूमिपूजन


Bhoomipujan of development works in the presence of MPs, MLAs at Sakari भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकरी येथे खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांची स्थानिक विकास निधीतून नुकतेच विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यात साकरीतील वॉर्ड क्रमांक एकमध्ये खासदार खडसे यांच्या निधीतून आठ लक्ष रुपयांच्या आणि वॉर्ड क्रमांक 2, 3, 4, 5 मध्ये आमदार निधीतून 50 लाख रुपये खर्चाच्य पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके, सुनील महाजन, जिल्हा चिटणीस भालचंद्र पाटील, माजी पंचायत समिती सभापती मनीषा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरपंच विनोद सोनोने, उपसरपंच रोशन पाटील यांच्य सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !