मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या आवारातून डंपर लांबवला : जळगावातील चालक-मालकाला अखेर बेड्या


Dumper removed from Muktainagar police station premises: Jalgaon driver-owner finally arrested भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरला पकडून महसूल पथकाने मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते मात्र मुजोर वाळू माफियांनी हा डंपरच पोलिस ठाण्याच्या आवारातून लांबवल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला होता. मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी जळगावजवळून डंपरसह दोघत्तंना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. राज मनोज कवळे (28, शंकरराव नगर, जळगाव, शंकर वासुदेव सोनवणे (24, शंकरराव नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संशयिताना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे नेमके प्रकरण
शुक्रवार, 13 रोजी मध्यरात्री 1.35 वाजता दीपनगर गेटजवळ विना क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे व ‘रूबाब’ लिहिलेले तसेच 7020570780/9421000725 क्रमांक लिहिलेल्या डंपरातून अवैध वाळू होत असताना भुसावळातील महसूल पथकाने डंपरचा पाठलाग केला मात्र चालकाने वाहन न थांबवता थेट मुक्ताईनगरकडे नेल्यानंतर पथकाने पाठलाग सुरूच ठेवला. पहाटेच्या सुमारास एका शेताजवळून डंपर ताब्यात घेवून पंचनाम्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात डंपर देण्यात आले होते. मुजोर वाळू माफियाने थेट पोलिस ठाण्याच्या आवारातून सोमवारी सायंकाळच्या सुमारास हे डंपर लांबवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.



पोलिस झाले फिर्यादी
ही बाब उजेडात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादी होत संशयित राज मनोज कवळे (28, शंकरराव नगर, जळगाव, शंकर वासुदेव सोनवणे (24, शंकरराव नगर, जळगाव) व सोनार आप्पा (जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. राज व शंकर यांना मंगळवारी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बहाद्दर माफियांनी दिला दुसराच डंपर
पोलिस संशयितांकडे धडकल्यानंतर संशयितांनी पोलिसांना पळवण्यात आलेल्या डंपरऐवजी दुसराच डंपर काढून दिला मात्र याबाबत तर्क-वितर्क सुरू झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपासचक्रे फिरवत मूळ डंपर ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर हवालदार विनोद सोनवणे, कॉन्स्टेबल सचिन जाधव, डिगंबर कोळी, संदीप वानखेडे, राहुल बेहेनवाल, रवी धनगर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !