पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात
भुसावळ : कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.डॉ.व्ही.एस. सोळुंके उपस्थित होते. प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख डॉ.जे.एफ. पाटील म्हणाले की, वाचनातून विद्यार्थी घडत असतात, विचारवंतांना ऐकण्याची संधी मिळते, वाचनाची प्रेरणा मिळत असते. अफाट वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते त्यासाठी किमान रोज वाचन केलेच पाहिजे. वक्ते प्रा.डॉ.आर.एस. नाडेकर यांनी आपल्या भाषणातून वाचनाचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले की, वाचनातून निर्माण झालेली संस्कृती कुठेतरी लयास जात आहे. व्यवहारातून आपल्या ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. काव्याचा रसास्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. कलात्मक मनोरंजक भाषेतून आपण वाचनाकडे पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील यांनी ज्ञान वृद्धिंगत व जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन केलेच पाहिजे, असे सांगितले.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन तर आभार प्रा.वंदना महाजन यांनी मानले. मराठी विभागातील जेष्ठ प्रा.डॉ.के.के.अहिरे, प्रा.डॉ.दिनानाथ पाठक, प्रा.गौतम भालेराव, डॉ.स्वाती महाजन यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमास प्रा.डॉ.एस.टी.धूम, प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.सचिन राजपूत, डॉ.ममताबेन पाटील, डॉ.स्मिता चौधरी, प्रा.संगीता भिरुड, प्रा.अक्षरा साबळे, प्रा.शीतल सोनवणे, प्रा.प्रतिभा गलवाडे, प्रा.योगीता भंगाळे उपस्थित होत्या.
