शेतात जात असलेल्या विवाहितेवर अत्याचार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
Atrocities on a married woman going to the fields : incident in Muktainagar taluka मुक्ताईनगर : शेती कामासाठी निघालेल्या शेतमजूर विवाहितेवर केळी बागेत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावाच्या शिवारात 3 रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. अत्याचारानंतर पीडीतेचे अश्लील अवस्थेत फोटो काढण्यात आले व ते व्हायरल करण्याची धमकीही आरोपीने दिली. याप्रकरणी बाळकृष्ण दयाराम वाघ या नराधमाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
केळी बागेत नेत केला अत्याचार
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहिता शेतात जात असताना संशयित बाळकृष्ण वाघ (मुक्ताईनगर तालुका) याने पीडीत विवाहितेला केळी बागेत नेत धमकावून अत्याचार केला तसेच अश्लील अवस्थेती फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडीतेने काही दिवस घाबरून पतीला हा प्रकार सांगितला नाही मात्र नंतर हिंमत करून पीडीतेने घडलेला प्रकार पतीला कथन केल्यानंतर मंगळवारी दाम्पत्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


