चोपड्यातील वनरक्षक तरुणीला पावणेपाच लाखांचा गंडा
A young forest guard in Chopda was given a sum of five lakhs जळगाव : जीवनसाथी अॅपद्वारे वनरक्षक तरुणीला भुरळ घालून विविध कारणाने भामट्याने तब्बल चार लाख 89 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी वनरक्षक रोशनी सहदेव झटाले (33, चोपडा, जि. जळगाव) यांच्या तक्रारीवरून डॉ.सनीष अमितव पेमा असे नाव सांगणार्या ठगाविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
चोपड्यातील वनरक्षक तरुणीला पावणेपाच लाखांचा गंडावनरक्षक म्हणून काम करणार्या रोशनी झटाले यांना डॉ. सनिष पेमा असे नाव सांगणार्याने संशयिताने जीवनसाथी अॅपवर रीक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण केली. तरुणीसोबत चॅटिंग करीत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगत 26 जुलै 2023 ते 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत कल्पना कश्यम नावाच्या गाझियाबाद, उत्तरप्रदेशातील एचडीएफसी बँकेच्या खात्यावर एकूण चार लाख 89 हजार रुपये स्वीकारले. यात आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोशनी झटाले यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.


